“डॉक्टर, माझी ही पाठदुखी जाणारच नाही का हो?” ,सायली मला कंटाळून विचारत होती. गेले आठ वर्षापासुन ती ह्या आजाराने बेजार झाली होती. वेदनाशामक औषधे घेऊन ती जगत होती. आयुर्वेदामधे ह्यासाठी काही उपाचार आहेत का हे विचारण्यासाठी ती माझ्या कन्सल्टिंग मधे आली होती. मी तिला शांत करित म्हटले,” तुझ्या पाठदुखीचे मूळ कारण आहे Disc Herniation. ह्यामधे दोन मणक्यांच्या हाडांमधील गादी अगदी अल्प प्रमाणात स्नायुंच्या मधुन बाहेर डोकावते आणि बाहेरची गम्मत बघता बघता तुमच्या आयुष्याचीच गम्मत करुन टाकते! कसं असतं बघ, आपल्या पाठीचा मणका हा आपल्य़ा शरीराचा, मेन्दुनंतर सगळ्यात महत्वाचा असा अवयव आहे.त्यामधे एकावर एक अश्या साधारण अर्धवर्तुळाकार, हाडांची साखळी असते. त्यामधील पोकळीतुन संपूर्ण शरीराला पुरवठा करणाऱ्या sensory and motor nerves चे जाळे असते. आपल्या मणक्याच्या हाडांवर एक घट्ट असं स्नायुंचं आवरण असतं जे मणक्य़ाला सतत आधार देत असतं. त्या स्नायुंच्या मजबुतीवर संपूर्ण मणक्याचे आरोग्य अवलंबून असते.तसेच दोन मणक्यांच्य मधे घर्षण होऊ नये म्हणुन एक स्नायुमय गादी असते (intervertibral disc) जी पाठीच्या कण्याच्या हालचालीच्या वेळेस वंगणाप्रमणे काम करते आणि मणक्यामधुन आत जाणऱ्या आणि बाहेर येणाऱ्या नाड्यांना इजा पोहचू देत नाही.
पण काही कारणाने ही गादी जर आपल्या जागेपासुन सरकली(slip disc), किंवा तुझ्या केसमधील जे disc herniation ,अश्या करणाने ह्या नाड्यांवर दाब पडतो.त्यामुळे पाठीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत वेदना,मुंग्या येणे,जडपणा वाटणॆ इ. लक्षणे उत्पन्न होतात. त्याला सायटिका असंही म्हणतात.”
सायली म्हणाली,” पण मग आयुर्वेदानुसार, हा व्याधी कसा होतो (pathology)?”मी तिला म्हट्ले,”बघ,माझ्या kirtitare.blogspot.com ह्या blog वर ,मी पंचमहाभूतांचे गुणधर्म आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम, हे वाचलंस तर तुला मी आता काय सांगणार आहे हे समजणे सोपे होइल.”
“आयुर्वेदामधे, ह्याला ग्रुध्रसी असं म्हणतात.पाठीच्या मणक्यामधुन निघणऱ्या sciatica नावाच्य़ा नाडीवर दाब पडल्यामुळे ,कंबरेपासुन पायाच्या अंगठ्यापर्यंत वेदना,मुंग्या येणे,बधिरता,पाय उचलताना दुखणे,कंबर अखड्णे ही लक्षणे निर्माण होतात.एक वातप्रधान ,दुसरी वातकफप्रधान असे दोन प्रकार असतात.हाडांची झीज होणे वातप्रधान तर जिथे कफाचा संबंध असतो अर्थात प्रुथ्वी आणि आप महाभूताच्या अनावश्यक वाढीमुळे अवरोध उत्पन्न होतो ती वातकफप्रधान ग्रुध्रसी होय.दोन्हींच्या उपचारात फरक असतो.”
“फार काळपर्यंत झोपुन राहणे(bedrest),एकाच जागी बसुन राहणे, वा एकाच जागी बसुन सतत काम करणे,पाठीच्या कण्याच्या हालचाली योग्य प्रकारे न करणे अथवा अजिबात न करणे इ. कारणे आणि थंड पदार्थ ,दुध व दुधाचे पदार्थ, गोड पदार्थ, फ्रिजचं पाणी, airconditioner चा अत्यधिक वापर असे पृथ्वि व आप महाभूत वाढवणारे कारणं घडल्यास शरीरात मलबद्धता, कंबर आणि त्या खाली जडपणा,चालताना कंबरेपासुन पायापर्यंत वेदना,मुंग्या येणे इ.लक्षणे दिसतात. या बरोबरंच,एकाजागी बसुन रहावेसे वाटणे,सुस्ती,झोपावेसे वाटणे,भुक कमी होणे,त्यामुळे अबरचबर, तिखट,मसालेदार पदार्थ खावेसे वाटणे इ लक्षणे दिसतात.ह्या प्रकारे पृथ्वि व आप महाभूत शरीरातील सर्व पोकळ्यांत भरुन जाऊन शरीरातील चलनवलनाला लागणारे ,अत्यावश्यक असे अवकाश (आकाश महाभूत) व्यापून टाकतात. त्यामुळे वायुच्या गतिला अडथळा ऊत्पन्न होऊन वेदना उत्पन्न होतात.उदा.,मोठ्या आतड्यांत मलबद्धता म्हणजेच पृथ्वि महाभूताची वाढ होते. त्याबरोबरंच पृथ्वि च्या आश्रयाने आप महाभूत वाढीस लागते.त्यामुळे तेथील अवकाश नष्ट झाल्यामुळे तेथील वायु महाभूताच्या गतिला विरोध होऊन gases होणे,अपचन ,छातीत जळजळणे, पोटात गुडगुडणे, जड वाटणे इ.लक्षणे उत्पन्न होतात. ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात हेच विकृत पृथ्वि व आप महाभूत शरीरात सगळीकडे पसरून अनेक प्रकारे व्याधी उत्पन्न करतात जसे, sinusitis,spondylitis,arthritis, etc.”
“Disc Herniation व्याधी पण ह्याच प्रकारात मोडतो.सुरवातीच्या काळात औषधे, स्नेहन(मालिश) , स्वेदन(शेक), व पंचकर्मतील बस्ती ह्या उपायांनी ह्या व्याधीतून पूर्णपणे बरे होऊ शकतो.पण अधिक काळ लोटल्यास स्नायुंची स्थितिस्थापकता (flexibility) कमी झाल्यामुळे disc herniation पूर्णपणॆ जायला खूप वेळ लागतो.ह्याचे कारण असे की, कालांतराने पृथ्वि व त्यामुळे वाढलेल्या वायुच्या रुक्ष गुणामुळे सांध्यातील तसेच स्नायुंतील वंगण म्हणजेच आप महाभूताचे शोषण होते व ते कडक होतात.स्नायुंमधील कडकपणामुळे पाठीच्या कण्याच्या हालचालींवर मर्यादा येतात.तसेच स्नायुमधुन डोकावणारा disc च्या भागाचा दाब तसाच कायम राहतो.Disc पण स्नायुमय असल्यामुळे त्यामधे कडकपणा उत्पन्न होऊन ती आपल्या जागी जाण्यास नकार देते.”
“ह्यासाठी प्रकृतीनुसार,योग्य ती औषधे उदा.त्रिकटु चूर्ण, गुग्गुळ ह्याचा आभ्यंतर उपयोग केल्या जातो.पंचकर्मांमधे सर्वांग स्नेहन,स्वेदन,कतिबस्ति,पत्रपोट्ट्ली,पिंडस्वेद,अनुवासन बस्ति व निरुह बस्ति इ अनेक उपाययोजना करुन ह्या व्याधीवर विजय मिळवता येतो.”